up 
देश

बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 10 जण जागीच ठार

सकाळन्यूजनेटवर्क

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या मुरादाबाब-आग्रा हायवेवर मोठा अपघात झाला आहे. एक मिनी बस, ट्रकच्या धकडेत 10 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळपास 12 लोक गंभीर जखमी झाले आहेत.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना मुरादाबाद जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी भोरमध्ये ही दुर्घटना झाली आहे. एक खासगी बस बिलारीतून मुरादाबाद येथे जात होती. नानपुरजवळ ती एका ट्रकला धडकली. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं आहे की, अपघात ओव्हरटेकिंग करण्याच्या नादात झाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

घटनेस्थळी डीएम आणि एसएसपी पोहोचले आणि मदत कार्य सुरु करण्यात आले. एसएसपीने सांगितलं की, फोरेंसिक टीमला बोलावण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की अपघात ओव्हरटेकिंगच्या नादात झाला आहे. दोन्ही वाहने एकमेंकांशी धडकली. मदतकार्य पूर्ण झाले आहे. अपघातात 10 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांप्रती दु:ख व्यक्त केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळच्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे भावुक; महामार्ग सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

OpenAI Startup : फॅक्टरीत बनणार हवं तसं बाळ! आयुष्यभर कसलाच आजार नसेल; पाण्यासारखा पैसा ओततायत लोक; काय आहे Gene-Edited Baby

Kolhapur Leopard: झुडपातून बाहेर आला बिबट्या! समोरच्या थराराने पशुपालकाचे हृदयच थरारले; म्हैस-बकऱ्या टाकून गावाकडे धूम

SCROLL FOR NEXT